यावलकरांचे आरोग्य धोक्यात

0

भुसावळ । यावल शहरातील श्री संत जनार्दन स्वामी ध्यान मंदिरासमोर नगरपालिका हद्दीतील अक्सानगर ईदगाहच्या मागे गटारींचे घाण पाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागातून दररोज सकाळी शंभरावर शेतमजूर शेतात जा-ये करतात तर भाविकही याच रस्त्याने मंदिरात येतात. पालिका प्रशासनाने तक्रार करूनही कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. मंदिरा येणार्‍या भाविकांनादेखील दुर्गंधीचा सामना करावा लागत असून यामुळे भावना दुखावल्या जात आहेत. पालिका प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यांनी दिले निवेदन
धनंजय अशोक सराफ, सचिन रमेशचंद्र, अक्षय संजय नेवे, सतीश असनूर तडवी कल्पना सुनील चौधरी, शीतल विलास पाटील, कविता शांताराम कोले, चंद्रकांत कोळी यांच्यासह अनेकांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत.