यावलकरांचे देशप्रेम ; सेवानिवृत्त जवानाची सजवलेल्या वाहनातून मिरवणूक

0

यावल- देश सेवेसाठी 17 वर्ष झटणार्‍या शहरातील स्वामी नारायण नगरातील रहिवासी मधुकर विठ्ठल जाधव या जवानाच्या सेवानिमित्त यावलकरांनी सजवलेल्या वाहनातून मिरवणूक काढल्याने जवानासह कुटुंबीयही भारावले. रविवारी बसस्थानकापासून एका सजवलेल्या वाहनावर जाधव यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. देशभक्तीपर गीे सादर करून सवाद्य निघालेल्या या मिरवणुकीने शहरवासीयांचे लक्ष वेधले होते. शहरातील विविध लोकप्रतिनिधींसह नागरीकांना या जवानाच्या निवासस्थानी भेट घेवुन पुष्पदेवुन स्वागत केले. देशाप्रती सैन्यदलात सेवा देण्याचे भाग्य आपणास लाभले व सेवा निवृत्तीनंतर अशा प्रकारे सन्मान मिळाला ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याच्या भावना जवान जाधव यांनी व्यक्त केली. जवानाची मिरवणूक काढण्यात आल्याने आई नलिनी व वडील विठ्ठल जाधव यांना देखील भारावून आले.