यावल । शहरातील वर्दळीच्या मुख्य भागात गेल्या काही दिवसांपासून मोकाट गुरांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने वाहनधारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पालिका प्रशासनाने या प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने जनतेत तीव्र संतापाची भावना आहे.
मोकाट गुरांमुळे पादचार्यांसह वाहनधारकांना वाहतूक करणे अवघड ठरत आहे शिवाय शहरातील मुख्य भागातच मोकाट गुरे ठाण मांडून असल्याने अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
मोकाट गुरांसह मालकांवर कारवाईची अपेक्षा
रस्त्यावर मोकाट गुरे सोडणे हा कायदेशीर गुन्हा असतानाही पालिका प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होताना दिसून येत नाही शिवाय या गुरांमुळे अपघात होवून अप्रिय घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्नही सामान्य यावलकर उपस्थित करीत आहेत. मोकाट गुरांना कोंडवाड्यात बंदिस्त करण्यासह गुरे मालकांवर कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.