यावल- तालुक्यातील टाकरखेडा शेळगाव बॅरेजवळ पोहण्यासाठी गेलेला तरुण तलावात बुडाल्याने खळबळ उडाली आहे. यावलमधील लहान मारोती जवळ देशमुख वाडा भागातील राहणारा निलेश सुरेश निंबाळकर हा आपल्या मित्रासह आसोदा-भादली मार्गावरील शेळगाव रस्त्याने जळगावहुन यावल येथे येत असतांना या मार्गावर येणार्या तापी नदीत शेळगाव बॅरीज जवळ 22 मे रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तापी नदीत पोहण्यास गेला असता तो पोहता पोहता अदृष्य झाला, असे त्याच्या सोबत असलेल्या मित्रांचे म्हणने आहे. बराच वेळ तो दिसुन न आल्याने तो बुडाल्याची भीती आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर यावल पोलिसांनी घटनास्थळी जावुन काही पोहणार्यांच्या मदतीने पाण्यात निलेश निंबाळकर याला शोधण्या चा प्रयत्न केला मात्र तो मिळुन आला नाही.