यावलचे के यु पाटील (मुख्याध्यापक ) यांची जिल्हा शारीरिक शिक्षक व क्रिडा शिक्षक संघाच्या आदर्श पुरस्कारासाठी निवड
यावल ( प्रतिनिधी )जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षक व क्रीडाशिक्षक महासंघ यांच्या वतीने१९९२ पासुन श्री दत्त हायस्कूल चिखली शंकुतला जि.महाजन माध्यामिक विद्यालय फैजपुर माध्यामिक विद्यालय विरोदे ता.यावल येथे सेवा करत असलेले यावल तालुक्यात क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेले मुख्याध्यापक के यु पाटील यांच्या कामाची दखल घेऊन जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ यांच्या वतीने त्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या दिवशी आदर्श क्रीडाशिक्षक मुख्याध्यापक सन्मानाने गौरविले जाणार आहे असे प्रत्र जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षक महासंघ चे सचिव राजेश जाधव यांनी पाठवले आहे सराची पुढील कार्याची दखल घेऊन त्यांना गौरवण्यात येणार आहे
क्रीडा समन्वयक यावल तालुका शासकिय क्रीडा स्पर्धाअध्यक्ष ( यावल तालुका ) महाराष्ट्र राज्य क्रीडाशिक्षक महासंघ(विविध उपक्रम) यावल तालुका शासकिय क्रीडास्पर्धा (दरवर्षी)राजकिय सामाजिक व्यक्तीकडुन आयोजित मँरोथोन स्पर्धा
आमदार चषक शिक्षक क्रीडास्पर्धा
सी एम चषक चला खेळुया फुटबाॅल मिशन युवा जागर वत्कृत्व स्पर्धा
Fit India Movement अंतर्गत क्रीडा सप्ताह शारीरिक चाचणी प्रशिक्षण
राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर प्रशिक्षण घेऊन जिल्हास्तरिय क्रीडाशिक्षकाना प्रशिक्षण दिले
शा.शिक्षणाचे नवीन अभ्यासक्रमाचे तज्ञ मार्गदर्शक म्हणुन शिक्षकाचे प्रशिक्षन घेतले व दिले
राष्ट्रीय स्पर्धासाठी महाराष्ट्र चा संघ व्यवस्थापक पदी निवड होऊन १९ वयोगटातील मुले मुली च्या संघाची जबाबदारी पुर्ण केली .उत्तर महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरकार२०२० ने सन्मानित
जिल्हास्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार २०२०गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार असे विविध पुरस्कार ने सन्मानित झालेले
इतिहास विषयामध्ये इयता ९ वी आणी१० साठी विषय शिक्षक मॉडेटर व नवीन अभ्यासक्रम सबमिशन पासुन राज्यस्तरापासुन विभागिय जिल्हा पातळीवरून तालुकास्तरा पर्यत तज्ञ मार्गदर्शक म्हणुन शिक्षकाना प्रशिक्षण दिले आहे
सामाजिक क्षेत्रात विविध पदाधिकारी म्हणुन जबाबदारीने रक्तदान शिबिरा, विद्यार्थी गुणगौरव सामारंभ व समाजउपयोगी मदती चे आयोजन असे कार्यत्पर मुख्याध्यापक के यु पाटील याचे यावल तालुक्यातील क्रीडा शिक्षक यांच्या वतीने अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे