यावलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांची तडकाफडकी बदली

0

यावल- यावलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांची 11 जून रोजी रात्री तडकाफडकी जळगाव नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी काढल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पुढील आदेश येईस्तोवर सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजित ठाकरे यांनी कामकाज सांभाळावे, असे आदेशात म्हटले आहे. पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी हे 27 जुलै 2017 रोजी यावल पोलिस ठाण्यात रूजूझाले होते. दोन वर्षाच्या कार्यकाळात सर्वसामान्य माणुस हा पोलिस प्रशासनाच्या अधिक जवळ येवून समन्यवयाच्या वयाच्या भावनेतून न्याय मिळवण्यासाठी अधिक जवळ आला होता त्यामुळे पोलिस आणी जनता ही यांच्यातील नेहमीच दिसून येणारा दुरावा हा नाहीसा झाला होता तर दुसरीकडे चोर्‍यांसह घरफोड्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणातील वाढ तसेच तालुक्यात विविध ठिकाणी घडलेल्या जातीय दंगलींमुळेदेखील कायदा-सुव्यवस्था मात्र धोक्यात आली होती.