यावलचे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी जहाँगीर तडवी शासनाच्या उत्कृष्ठ अभियंता पुरस्काराने सन्मानित

यावल ( प्रतिनिधी ) येथील तालुक्यातील बोरखेडा गावात राहणारे व आदीवासी कुटुंबात जन्मले व यावल येथे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेले उपविभागीय अधिकारी जहाँगीर शावखा तडवी यांचा विविध मान्यवरांच्या उपस्थित महाराष्ट्र शासनाच्या उल्लेखनिय कामगिरी करणारे अभिमंता या पुरस्काराने सन्मानित,करण्यात आले , त्यांना मिळालेल्या या पुरस्कार बद्दल समाजातील विविध संघटनांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे . यावल तालुक्यातील सातपुडा पर्वता च्या पायथ्याशी असलेल्या बोरखेडा या आदीवासी गावात जन्माला आलेले जहाँगीर शावखा तडवी हे यावल येथील सार्वजनिक बांधकाम विभागात उपविभागीय अधिकारी म्हणुन कार्यरत असुन, त्यांचे नुकतेच षण्मुखानंद सभागृह माटुंगा मुंबई येथे संपन्न झालेला महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री ना.रविन्द्र चव्हाण,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीमती मनिषा पाटणकर म्हैसकर व आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळयात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या अभियंतांना शासनाच्या दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने गौरविण्यात आले, यात जहाँगिर शावखा तडवी यांचा देखील उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल पुरस्काराने गौरविण्यात आले . पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे सर्व समाज बांधव , यावल विभागातिल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व त्यांचे सर्व सह कर्मचारी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात .