अन्य चौघा पसार आरोपींचा यावल पोलिसांकडून शोध सुरू
यावल- शहरातील विरार नगर येथून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्या प्रकरणी 20 जुन रोजी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला ोता. या गुन्ह्यातील हमीद दौलत पटेल या संशयीतास शनिवारी अटक करण्यात आली असून कइतर संशयीतांचा पोलिस शोध घेेत आहेत. शहरातील विरार नगर भागातील 17 वर्षीय अल्पवयीन दिनांक 16 जून 2018 रोजी आपल्या कुटुंबासह रात्री घरात झोपली होती मध्यरात्रीनंतर ती घरात न आढळल्याने तिचा शोध घेण्यात आला तर तिला शहरातीलच रहिवासी आरिफ भटू पटेल या तरुणाने मरियम दौलत पटेल, हमीद दौलत पटेल, शकील दौलत पटेल सर्व रा. यावल व कमा नजीर पटेल (रा.पिंप्री ता. धरणगाव) या पाच जणांनी तिला फूस लावून पळवून नेत अपहरण केल्याचा संशय घेत या सर्वांविरूध्द 20 जून रोजी यावल पोलिसा अल्पवयीन मुलीच्या वडीलांनी फिर्याद देेत गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून सदरील तरूण व त्या अल्पवयीन मुलीचा सर्वत्र शोध सुरू होता. शनिवारी या गुन्ह्यातील हमीद दौलत पटेल यांना सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजीत ठाकरे व त्यांच्या पथकाने अटक केली. रविवारी त्यांना न्यायलयात हजर केले जाणार असुन अल्पवयीन मुलगी व इतर संशयीतांचा शोध पोलिस घेत आहेत.