यावलच्या कन्या माध्यमिक विद्यालयात कृषी विभागाचे विविध मान्यवरांच्या उपस्थित जागतिक पौष्टीक तृणधान्य दिन संपन्न
यावल ( प्रतिनिधी ) येथील जगन्नाथ शिक्षण प्रसारक मंडळ व्दारे संचतीत शशीकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालय यावल येथे आयोजित आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिना निमित्त कृषी क्षेत्रातील मान्यवरांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाचे कार्यक्रमा संपन्न झाले . आयुष्यभर निरोगी आहार गर्भधारणे च्या निरोगी परिणामांना चालना देतो , सामान्य वाढ ,विकास आणी वृद्धत्वास समर्थन देतो ,पौष्टीक आहार म्हणजे असे जेवण आहे जे तुमच्या शरीराचे कार्य आणी ऊर्जा टिकवुन ठेवण्या साठी आवश्यक असलेली पोषक तत्वे पुरवतात पाणी कबौदके ,चरबी, प्रधिने ,जिवनसत्वे आणी खनिजे हे मुख्य पोषक घटक असल्याची माहीती विद्यालयात आयोजीत व्याख्यनाच्या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्याथींना मार्गदर्शन करतांना तृण धान्याचे महत्व यावल तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांनी दिली. मंडळ कृषी अधिकारी पी आर कोळी , कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ नलिनी पाटील तसेच कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक,माध्यमिक कन्या विद्यालयातील कर्मचारी वृंद विद्यार्थिनी मोठया संख्येत उपस्थित होत्या.