यावल- यावल वनविभागाच्या फिरत्या गस्ती पथकाने बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास खडकाई नदीतील काटेरी झुडूपातून 23 हजार 500 रुपये किंमतीचे सागवानी लाकूड जप्त केले. सागवानी लाकडाचे 23 नग यावल डेपोत जमा करण्यात आले आहे. ही कारवाई यावल उपसंरक्षक प्रकाश मोराणकर, धुळे वन अधिकारी उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली गस्ती पथकाचे वनक्षेत्रपाल गस्ती एस.आर.पाटील, यावल पूर्वचे वनक्षेत्रपाल व्ही.एम.पाटील, डोंगरकठोरा वनपाल रवींद्र सोनवणे वनपाल, वनरक्षक रवींद्र बी.पवार, वनरक्षक संदीप पंडित, पोलिस कॉन्स्टेबल सचिन तडवी, चालक भरत बाविस्कर आदींच्या पथकाने केली.