यावल ( प्रतिनिधी ) येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे टी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल यावल येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी गोपाळकाला मोठ्या उत्साहात वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्याप्रसंगी अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य रंजना महाजन,प्राचार्य डॉ.किरण खेट्टे उपस्थित होते. सर्वप्रथम सरस्वती मातेच्या व भगवान श्रीकृष्णा च्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमांमध्ये सेमीच्या विद्यार्थ्यांनी कृष्ण जन्मावर आधारित नाटिका सादर केली तसेच इंग्लिश मीडिया च्या विद्यार्थ्यांनी देखील सुन्दर असे रासलीला चे नृत्य सादर केले, विद्यार्थ्यांनी राधाकृष्ण च्या पारंपारिक वेशात आले होते.
शाळेतील मोठ्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात फोडली व सर्वांना प्रसाद देण्यात आला कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या शिक्षिका रूपाली खेट्टे ,दिपाली धांडे यांनी विद्यार्थ्यांना श्रीकृष्ण अष्टमीचे महत्व सांगितले त्यानंतर अध्यक्ष भाषणात प्राचार्य रंजना महाजन यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना खाचणे यांनी केले व आभार प्रदर्शन प्राजक्ता वाणी मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वी साठी पर्यवेक्षिका लोखंडे व भिरुड यांच्यासह शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी यांनी चे मोलाचे सहकार्य लाभले