यावल : येथील मूळ रहिवासी नाशिकमध्ये कामानिमित गेलेल्या 27 वर्षीय तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची केल्याने शहरातील सुतारवाडा भागात खळबळ उडाली आहे. कृष्णा अढळकर असे मयत तरुणाचे नाव आहे. यावल शहरातील सुतार वाड्यातील कृष्णा रामानंद अढळकर हा तरुण गेल्या काही दिवसांपासून अंबड, जि.नाशिक येथे औद्योगीक वसाहतीमध्ये एका कंपनीत कामास होता. त्याने अंबड शहरातील राहत असलेल्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आल्याने त्याचे यावलमधील आप्तही रवाना झाले आहेत. मयत तरुण हा अविवाहीत होता मात्र त्याने आत्महत्या का केली ? याचे कारण मात्र अद्याप कळु शकले नाहीत . कृष्णा अढळकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर विभागाचे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांचे चुलत बंधू होत.