यावल (प्रतिनिधी)- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना ई- पीक पाहणी बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे या होत्या.
महाराष्ट्र शासन अंतर्गत यावल तहसील व यावल महाविद्यालय यांच्या मध्ये सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. या करार अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या करारांतर्गत ई-पीक पाहणी बाबत महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी प्रथम ई-पीक पेरा ॲप डाऊनलोड करून शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन करून घ्यावे. महाविद्यालयातील बरेचसे विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असल्यामुळे विद्यार्थ्यांना आपापल्या गावात वंचित शेतकऱ्यांचे ई-पीक पाहणी करून पिक पेरा लावणे. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी खारीचा वाटा घ्यावा. उन्नतीसाठी युवा हाच दुवा असे आवाहन केले.
कार्यक्रमात उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार,उपप्राचार्य प्रा.ए.पी. पाटील,डॉ.एस.पी.कापडे,डॉ.हेमंत भंगाळे,डॉ.पी.व्ही.पावरा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.आर. डी.पवार यांनी केले,तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार प्रा.सौ.पी.व्ही. रावते यांनी मानले.कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपुर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.सी.टी.वसावे,प्रा. सुभाष कामडी,डॉ.संतोष जाधव डॉ. निर्मला पवार,डॉ.वैशाली कोष्टी प्रा.अर्जुन गाढे,प्रा.पी.व्ही.मोरे यांनी विशेष सहकार्य केले.