यावलच्या महाविद्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत सूक्ष्मदर्शकाचे महत्त्व व वापर विषयावर विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा

यावल (प्रतिनिधी) येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली प्राणीशास्त्र विभागाअंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.

विद्यार्थ्यांना ‘सुक्ष्मदर्शकाचे महत्व व वापर या विषयावर प्रा.मयुर सोनवणे यांनी मार्गदर्शन करताना सूक्ष्मदर्शकाचे विविध प्रकार व त्याचे महत्त्व सविस्तर सांगितले , कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालया च्या प्र.प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना संशोधन करतांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी सूक्ष्मदर्शक व इतर उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागतो असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजु तडवी यांनी केले.तर उपस्थितांचे आभार प्रा.मनोज पाटील यांनी मानले.
कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा.एम.डी. खैरनार, प्रा.अर्जुन पाटील उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमृत पाटील,अनिल पाटील, प्रमोद जोहरे यांनी सहकार्य केले.