यावल- शहरातील बाबुजीपुरा परीसरातील रहिवासी बिल्कीसबी सैय्यद इफ्तीखार अली (55) यांचे 16 मे रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास गोदावरी रुग्णालयात उपचार घेत असतांना निधन झाले. त्या शाहीन टेलर या दुकानाचे संचालक इफ्तीखार अली सेय्यद यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परीवार आहे. मुस्लीम धर्मानुसार रमजान हा सर्वात पवित्र पर्व मानले जाते. या महिन्यात मयत झालेली व्यक्तिला भाग्यवान मानले जाते. गुरुवारी सकाळी 10 वाजता बिल्कीस बी.यांच्यावर ख्वाजा मस्जिद कब्रस्थानमध्ये दफनविधी करण्यात आले .