यावल : होम अप्लायन्स वस्तू देण्याच्या नावाखाली यावलच्या महिलेची तब्बल साडेचार लाखात फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील मेनरोड गवत बाजार जवळील रहिवासी शुभांगी जुगल पाटील (24) यांच्याशी रीमार्ट शॉपी कंपनीचे मालक विलास मोतीराम राठोड (रा.अंबेजोगाई रोड, ता.रेणापूर, जि.लातूर) यांनी 999 ब्रॉन्ड बाजार या नावाने रीटेल शॉपीसाठी विविध गृहोपयोगी वस्तू विक्रीसाठी संपर्क केला होता व त्यानुसार महिलेने राठोड यांच्या सांगण्यावरून विविध साहित्यासाठी वेळोवेळी त्यांना साडे चार लाख रूपये त्यांनी दिलेल्या बँक खात्यात जमा केले. ऑर्डर दिल्यानंतरही अद्यापपर्यंत साहित्य न आल्याने व संबंधित उडवा-उडवीची उत्तरे देत असल्याने फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर महिलेने तक्रार दिल्यावरून संशयीत आरोपी विलास राठोडा यांच्याविरोधात यावल पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक अजमल खान पठाण करीत आहे.