लाच प्रकरण ; प्रस्तावासाठी घेतली होती एक हजार 500 रुपयांची लाच
भुसावळ:- प्रस्तावातील त्रृटींची पूर्तता करण्यासाठी एक हजार 500 रुपयांची लाच मागणार्या यावल तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सहाय्यक कृषी सहाय्यक रामसिंग भोमसिंग पवार यास जळगाव एसीबीने सोमवारी सकाळी पावणे बारा वाजता अटक केली होती. आरोपीविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर मंगळवारी दुपारी त्यास भुसावळच्या अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
प्रस्तावासाठी मागितली होती लाच
डांभूर्णी येथील रहिवासी व जळगावच्या जनाई ईरीगेशनमधील अभियंत्यांने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. 1 मार्च आरोपीने शेतकर्यांकडील ठिबक सिंचन अनुदानाचे प्रस्ताव तयार करून ते पुढील कारवाईसाठी पाठवण्यासाठी एक हजार 500 रुपये मागितले होते मात्र तक्रारदारास लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचून आरोपीस अटक करण्यात आली होती. घड झडतीत आरोपीकडून तक्रारदाराच्या अनेक फाईल्सही जप्त झाल्या होत्या. मंगळवारी न्यायालयात जळगाव एसीबीच्या निरीक्षक नीता कायटे यांनी बाजू मांडली.