यावलच्या वयोवृद्ध प्रवासाचा जळगाव विदगाव मार्ग यावल एसटी बसच्या प्रवासात मध्ये ह्वदयविकाराने दुदैवी मृत्यु पोलीसात नोंद

यावल ( प्रतिनिधी ) येथील महाजन गल्लीमध्ये राहणारे सेवानिवृत्त नायब तहसीलदार वसंत गणपत पाटील वय८६ वर्ष हे नियमितपणे आपल्या आरोग्याची करण्यासाठी जात असे आज दिनांक १५ सप्टेंबर रोजी यावल कडे येत असतांना त्यांचा एसटी बस मध्येच प्रवास करीत मृत्यु झाला. या संदर्भातील मिळालेली माहिती अशी की , यावल येथे राहणारे वसंत पाटील हे जळगाव येथे डोळयांच्या तपासणी साठी गेले असता ते परतीच्या मार्गावर जळगाव हुन यावल कडे येणाऱ्या एसटी बस क्रमांक एमएच २० बिएल ०९५३ या बसने आपल्या गावी यावल येत असतांना वाटेत ४,२oवाजेच्या गिरडगाव जवळ त्यांना ह्वदयविकाराच्या झकटा आल्याने ते बेशुद्ध पडले नंतर साकळी गावा जवळ बस आली असता ते मरण पावले असे एसटी कर्मचारी यांनी माहिती दिली . त्यांना बेशुद्ध अवस्थेत तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारा साठी आणले असता , वैद्यकीय अधिकारी डॉ मयुर चौधरी यांनी तपासणी केली असता त्यांना मृत घोषीत केले . अशा प्रकारे चालत्या एसटी बसमध्ये प्रवासाचा मृत्यु होण्याची पन्द्राहा दिवसाती ही दुसरी घटना आहे. याबाबत एसटी तील यावल आगाराच्या वाहक रोशनी सोनवणे यांनी खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे .घटनेचे वृत्त कळताच यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन, वाहतुक चालक दिलीप ठाकरे यांनी ग्रामीण रूग्णालयात भेट दिली .