यावल- शहरातील रीजवाना शेख नासीर (27) या विवाहितेने मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास संतापाच्या भरात आपल्या आरजु शेख नासीर या 8 महिने वयाच्या बालिकेला विषारी द्रव्य पाजून स्वत:देखील विषारी द्रव्य प्राषण करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच दोघांना तत्काळ येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार्थ दाखल केले येथे प्रियंका मगरे, राजु जेधे यांनी प्रथमोपचार करीत पुढील उपचाराकरीता दोघांना जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात हलवले. दरम्यान विवाहितेने आत्महत्येचा प्रयत्न का केला ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही तर दोघांची प्रकृती नाजूक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.