यावलच्या विवाहितेचा विनयभंग ; चौघांविरुद्ध गुन्हा

0

यावल- 32 वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी शनिवारी रात्री उशीरा यावल पोलिसात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश नगरातील 32 वर्षीय विवाहितेची लहान मुलगी शुक्रवारी खेळत असतांना पागल म्हटल्याचा संशय शेजार्‍यांना आल्याने शेजारील रमेश रामदास मेथाळकर, स्वप्निल रमेश मेथाळकर, शर्मिला रमेश मेथाळकर व स्वाती रमेश मेथाळकर या चौघांनी त्या महिलेला येऊन अश्लील भाषेत शिवीगाळ केली व पुरूषांन महिलेचा विनयभंग केला. यावल पोलिसात या प्रकरणी विनयभंग सह विविध कलमान्वये चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील करीत आहेत.