यावलच्या विवाहितेचा 50 हजारांसाठी छळ : पतीसह 11 जणांविरुद्ध गुन्हा

0

यावल- माहेरून 50 हजार रूपये आणावे या मागणीसाठी शहरातील पंचवटी भागातील रहिवासी दीपमाला दिनकर बाविस्कर (28) या विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती दिनकर पंढरीनाथ बाविस्कर (ह.मु.अम्रोली, जलाराम मंदिरामागे, दुल्लभ कॉलनी, तापी दर्शन अपार्टमेंट, सूरत), सासू निर्मला पंढरीनाथ बाविस्कर, नणंद करुणा जितेन्द्र सोनवणे, नंदोई जितेंद्र सोनवणे (सर्व रा. सूरत), नणंद शीला भास्कर शेजवळ, भास्कर प्रल्हाद शेजवळ (रा.अमळनेर), मेघना भानुदास तायडे, भानुदास एकनाथ तायडे (रा.विरार), विकास गिरधर पारधे, प्रीतम गिरधर पारधे व पुरुषोत्तम विकास पारधे (रा. कुर्‍हा, ता. भुसावळ) यांच्याविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. विवाहितेचा 2 जून 2010 रोजी विवाह झाल्यानंतर लग्नात मानपान दिला नाही, विवाहितेस व्यवस्थित स्वयंपाक येत नाही या कारणावरून छळ करण्यात आला तसेच शारीरीक व मानसिक त्रास देत मारहाण करून विवाहितेला तिच्या दोन्ही मुलांसह यावलला माहेरी पाठवून देण्यात आले. तपास पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, हवालदार संजय तायडे करीत आहेत.