यावल : भुसावळ रस्त्यावर शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास बसने दिलेल्या धडकेने दुचाकीवरील दोघे जखमी झाले. जखमींना तातडीने महाराष्ट्र गुजरात धाब्यावरील कर्मचार्यांनी मदतीचा हात देत यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
एस.टी.बस-दुचाकीत अपघात
औरंगाबाद-यावल बस (क्र.एम.एच.20 बी.एल. 2397) शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास यावल शहराकडे येत असताना दुचाकीने (क्र.एम. एच. 19 डी.बी. 3365) जनता बँकेतील कर्मचारी जयेश रमेश जोशी (वय 47, रा. भुसावळ) व त्यांच्यासोबत राजेश व्यास (वय 40, रा. जामनेर) हे भुसावळकडे येत असताना बस-दुचाकीत अपघात घडल. या अपघातात राजेश व्यास यांच्या पायाला दुखापत झाली तर जयेश जोशी यांनादेखील किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर शेरखान, जुबेर खान, जुल्फीकार खान यांनी जखमींना यावल ग्रामीण रुग्णालयात हलवले.