यावल- मिठाच्या गोण्या वाहून नेणार्या ट्रकवर समोरून येणारी ट्रक धडकून झालेल्या अपघातात एका ट्रकचा चालक जखमी झाला. हा अपघात गुरूवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास भुसावळ रस्त्यावर झाला. यावलकडून भुसावळकडे मिठाच्या गोण्या वाहून नेणारा ट्रक (जी.जे. 25 यु. 9828) हा चालक जेसा लक्ष्मण मोडवाडीया (रा.गडू ता.बानवड, जि.देवभुमी व्दारका, गुजरात) हा घेवून जात असताना भुसावळ रस्त्यावरील महाराष्ट्र ढाब्याजवळ भुसावळ कडून यावलकडे येणारा ट्रक (क्रमांक एम.एच. 34 ए.व्ही. 0925) वरील चालक धर्मेंद्र रामप्रताप निषाद (26, रा.शिमगरा, ता.बबेरू जि.बांधा, उत्तर प्रदेश) हा वाहन घेवून जात असताना त्याचा वाहनावरील ताबा सुटला व त्याने समोरील ट्रकला धडक दिल्याने त्याचा ट्रक कलंडला. या अपघातात तो स्वतः गंभीर जखमी झाल्याने ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत यावल पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.