यावलमधील कायदा-सुव्यवस्थेचा जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून आढावा

0

यावल- लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जारी झाली असून या निमित्ताने रावेर मतदारसंघात येणार्‍या यावल तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी यावल पोलिस ठाण्याला भेट दिली. फैजपूर उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, तहसीलदार जितेंद्र कुवर, पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे उपस्थित होते.

अधीक्षकांनी घेतला आढावा
जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पोलिस ठाणे अंतर्गत विविध गुन्ह्यातील आरोपींवर केलेली कारवाईचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे रात्री निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची गस्त तसेच ठिकठकाणी करण्यात येणारी नाकाबंदी बाबतची माहिती घेतली. स्वतः हा काही भागात फेरफटका मारला. अचानक शहरात भेटीला आलेल्या जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या या भेटीबाबत शहरातून अनेक तर्क-वितर्क लावले जात होते मात्र सदरील भेट ही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन कशा प्रकाराने केले पाहिजे व पोलीस प्रशासनाच्या कामाचा आढावा घेण्याकरिता होत, असे सांगण्यात आले.