यावलमधील खाटीकवाड्यात हाणामारी; सहा जण जखमी

0

रावल प्रतिनिधी – शहरातील खाटीक वाड्यात भंगार साहित्य घरासमोर का ठेवले? या कारणावरून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत एकाच कुटुंबातील सहा जण गंभीर जखमी झाले तर यातील तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

भंगार साहित्य घराबाहेर बाहेर ठेवल्याचा राग
बाबूजीपुरा भागातील खाटीक वाडा भागातील रहिवासी बिस्मिल्ला नथ्थू खाटीक यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. मंगळवारी साडेआठ वाजण्राच्रा सुमारास त्रांच्रा घरासमोर शफी अलाऊद्दीन खाटीक रांनी काही भंगार सा हित्र टाकल्यानंतर वाद उफाळला. शफी खाटीकसह क मरोद्दीन अलाऊद्दीन खाटीक, रफीक अलाऊद्दीन खाटीक, खालीद अलाऊद्दीन खाटीक, मो.अली कमरोद्दीन खाटीक, साबीर नबी खाटीक (सर्व रा. खाटीक वाडा, रावल) व इमरान अकबर खाटीक (रा. रावेर) रा सात जणांनी लाठ्या-काठ्या व लोखंडी रॉडने हल्ला चढवला. शेख नथ्थू शेख महेबुब खाटीक (78) , सज्जाद नबाब खाटीक (30) व शबानाबी दस्तगीर खाटीक (30) गंभीर जखमी झाले.