यावल । शहरातील बारीवाड्यात पालिकेच्या माध्यमातून 8 दिवसांपूर्वी पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले. मात्र यात गुणवत्ता न राखल्यामुळे आठच दिवसात या ब्लॉकची तुटफूट झाली आहे. या कामावर अधिकार्यांचे नियंत्रण नसल्यामुळे निकृष्ठ दर्जाची कामे होत असल्याची ओरड नागरिकांमध्ये केली जात आहे. त्यामुळे अशा कामांची चौकशी करण्याची मागणी देखील शहरातील सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे.