यावलमधील 23 वर्षीय विवाहितेवर अनैसर्गिक अत्याचार : आरोपी पतीला अटक

यावल : 23 वर्षीय विवाहितेवर पतीकडून अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना शहरात घडली. या प्रकरणी पतीविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पतीस अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
शहरातील एका परीसरात राहणार्‍या 23 वर्षीय विवाहिता आपल्या पतीसह राहते. लग्नाच्या आठ दिवसानंतर पतीला दारूचे व्यसन जडले. दारूच्या नशेत घरी येवून पत्नीशी अनैसर्गिक कृत्य करून अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला. विवाहितेने लव्ह मॅरेज केल्याने लग्नात हुंडा मिळाला नाही म्हणून आता दिवाळीसाठी माहेरहून कार, रोख रक्कम व सोन्याची अंगठी आणावी यासाठी विवाहितेचा छळ केला. अत्याचार सहन न झाल्याने त्यांनी यावल पोलीस ठाणे गाठलत पतीविरोधात गुन्हा दखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गर्शदनाखाली सहा.पोलीस निरीक्षक अजमल खान पठाण, पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.