Dahigaon farmer’s bike stolen from Yawal यावल : तालुक्यातील दहिगाव येथील शेतकर्याची 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी यावल शहरातील जुन्या पेट्रोल पंपासमोरून चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी मंगळवारी यावल शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यावल पोलिसात गुन्हा दाखल
तक्रारदार नामदेव दामू पाटील (45, दहिगाव, ता.यावल) हे यावल येथे सोमवार, 11 रोजी कामानिमित्त यावल शहरात आले असता त्यांनी दुचाकी (एम.एच.19 सी.सी.7831) जुन्या पेट्रोल पंपाजवळ लावली असता चोरट्यांनी संधी साधत दुचाकी दुपारी 12 वाजेच्या सुमारास लांबवली. या प्रकरणी यावल पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय असलम खान दिलावर खान करीत आहेत.