यावलमध्ये अवैध वाळूची वाहतूक : ट्रॅक्टरसह ट्रॉली जप्त

यावल : तालुक्यातील किनगाव-ईचखेडा रस्त्यावरून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर यावल पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह ट्रॉली जप्त केली. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात दाखल झाला गुन्हा
यावल तालुक्यातील किनगाव ते ईचखेडा रस्त्यावर यावलचे पोलिस कर्मचारी गस्तीवर असतांना मंगळवार, 18 जानेवारी रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच. 10 सी.वाय. 4161) व विना नंबरची ट्रॉली यात बेकायदेशीर वाळू आढळली तर परवानाही चालकाने न दाखवल्याने कर्मचारी सुशील घुगे यांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर यावल पोलिसात जमा केले. सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक गुणवंत गणेश सोळुंखे व दीपक गणेश सोळुंखे (दोन्ही रा.कोळन्हावी, ता.यावल) यांच्या विरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस नाईक नरेंद्र बागुले करीत आहे.