यावलमध्ये एकाच कुटुंबातील चौघांना मारहाण

0

दोन्ही गटाच्या फिर्यादीनुसार परस्परविरोधी गुन्हे दाखल

यावल- आमच्या गल्लीद वारंवार का फिरतो या कारणावरून दारूच्या नशेत असलेल्या एका सोबत चौघांनी एकाच कुटुंबातील तिघांना घरात घुसून बेदम मारहाण केल्याचीघटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेत चार जण जखमी असून एक जण गंभीर आहे. या प्रकरणी यावल पोलिसात परस्परविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. शहरातील गणपती नगर भागातील रहिवाशी हाजी गफ्फार शाह मुसा शहा (60) यांच्या फिर्यादीनुसार शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घरात त्यांच्या पत्नी शमीम बानो व मुलगा अशपाक शाह (30) असताना सैय्यद इब्राहिम सैय्यद इस्माईल, शेख शरीफ शेख निजाम, शेख इकबाल शेख निजाम व शाहीनबी सैय्यद इब्राहिम (सर्व रा.आयशानगर) हे आले. त्यातील सैय्यद इब्राहिम याच्या हातात लोखंडी रॉड तसेच शेख शरीफ व शेख इकबाल यांच्या हातात लाकडी दांडे होते. त्यावेळी सैय्यद इब्राहिम हा दारूच्या नशेत शहा यांचा मुलगा अशपाक यास म्हणाले की, तु आमच्या गल्लीत का येतो तेव्हा त्याने सांगितले की रमजान महिना असल्याने मी चंदा गोळा करत आहे मात्र संशयीतांनी तु वारंवार येतो, असा आरोप करीत थेट घरात घुसून मारहाण केली. त्यात त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली असून छातीवर व अंगावर जबर मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या शमीम बानो व गफ्फार शाह यांनादेखील जबर मारहाण झाली आहेयात अशपाक शाहच्या डोक्याला जबर दुखापत होऊन तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हलवण्यात आले. चारही संशयीतांविरुद्ध अनधिकृतपणे घरात घुसून प्रवेश करीत मारहाण व जबर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गोरख पाटील करीत आहे.

दुसर्‍या गटाच्या फिर्यादीनुसार गुन्हा
दुसर्‍या गटाच्या शायना बी.शेख इब्राहिम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गफ्फार शाह अशपाक शाह, शमीम बानो या तिघांनी आपल्याविषयी चुकीचे वक्तव्य केल्यावरून झालेल्या वादात शेख इब्राहिम यांना जबर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे करीत आहे.