यावलमध्ये कार-दुचाकीच्या धडकेत पिता-पूत्र जखमी

0

यावल : शहरातील महाविद्यालयासमोर फैजपूर रस्त्यावर दुचाकी व कारची धडक होऊन दोन जण जखमी झाले. हा अपघात शनिवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडला. जखमींवर यावलला प्रथमोपचार करून जळगाव हलवण्यात आले आहे. सावखेडासीम, ता.यावल येथील रहिवासी अन्वर अकबर तडवी (20) व अकबर हसन तडवी (52) हे दुचाकीद्वारे फैजपूरकडून यावल शहरात येत असताना यावल शहरातून फैजपूरकडे चारचाकी (क्रमांक एम.पी.09 टी. ए. 8781) मध्ये समोरा-समोरा धडक झाली. यावल महाविद्यालयासमोर हा अपघात होवून त्यात तडवी पिता-पुत्र गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉ.प्रल्हाद पवार, अधिपरीचारीका निलीमा पाटील, पिंटू बागुल आदींनी प्रथमोपचार केले व त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तात्काळ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हलविण्यात आले.