यावलमध्ये कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत लाभार्थींना धनादेशाचे वाटप

0

यावल- तहसील कार्यलयात राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत मे 2018 मध्ये पात्र 30 लाभार्थींना मंगळवारी आमदार हरीभाऊ जावळे यांच्या हस्ते प्रत्येकी 20 हजारांचा धनादेश देण्यात आला. राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत द्रारीद्य्र रेषेखालील कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मृताच्या कुटुंबातील व्यक्तीला एकरक्कमी अर्थसहाय्य दिले जाते.

30 लाभार्थींना मिळाला धनादेश
या योजनेंतर्गत लाभार्थी माया चौधरी, इंदूबाई मिस्तरी, सैदाबी पटेल, शमीम बी.रीरयाजोद्दीन, रजीया बी.शेख हारून, कमलाबाई चव्हाण, शबाना बी.खाटीक, आशा केदारे, कौशल्या भालेराव, बेबाबाई वराडे, बेबाबाई सोनवणे, कविता कोळी, मंगला कोळी, विजया सपकाळे, जयश्री निकम, मंजुळाबाई सपकाळे, ललिता वारके, रजिया तडवी, आशाबाई भील, रंजना कोळी, मंगला पाटील, सुरेखा मोरे, सकिनाबाई तडवी, शोभा झाल्टे, ममता सोनवणे, शैला गुरव, जनाबाई तायडे, तुळासाबाई सपकाळे, कल्पना मिरगे, मंगला किरंगे यांना धनादेश देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावल तहसीलदार कुंदन हिरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, संजय गांधी समितीचे अध्यक्ष विलास चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.नरेंद्र कोल्हे , सरचिटणीस उजैंनसिंग राजपूत, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य सदस्य हर्षल पाटील, जि.प.सदस्य सविता भालेराव, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, डांभुर्णी सरपंच पुरुजीत चौधरी, अतुल भालेराव, लहु पाटील, संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार एस.जी.सौंदाने, संजय गांधी योजनेचे लिपिक मयुर पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व शासकीय कर्मचारी उपस्थित होते.