प्रशासनासह नागरीकांची वाढली चिंता : नागरीकांना घरातच थांबण्याचे आवाहन
यावल : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर लावण्यात आलेल्या चौथ्या लॉक डाऊनचा रविवारी शेवटचा दिवस असलातरी शहरात सातत्याने वाढणार्या रुग्ण संख्येमुळे नागरीकांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे. यापूर्वी 18 पॉझीटीव्ह रुग्णांच्या संख्येने आता नव्याने तीनने भर पडली असून रुग्ण संख्या 22 वर पोहोचली आहे. यावल तालुक्यात कोरोना या आजाराने कहर केला असून प्रथम डॉक्टर, पित्रा पुत्रानंतर, नगरसेवक सख्ख्ेभाऊ व आता पोलिस पाटील पिता-पुत्रासह एका माजी नगरसेवक पत्नीचाही यात समावेश झाला आहे. या सर्वांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझीटीव्ह आल्याने रुग्ण संख्याही 22 वर पोहोचली आहे. यावल शहरात एकूण 14 प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करण्यात आले असून कोरोनाबाधीत पॉझीटीव्ह रुग्णांची वाढणारी संख्याही धोक्याची घंटा आहे.