यावलमध्ये गादी भंडार पेटले ; सुदैवाने मोठी हानी टळली

0

यावल- दुकानात शार्ट सर्किट झाल्याने सुदर्शन चौकातील ताज गादी भंडार या दुकानाला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. पालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत आग विझवल्याने अन्य घरांना आगीची झळ पोहोचली नाही अन्यथा मोठी हानी झाली असती. शहराततील शेख रफीक शेख कादर पिंजारी यांच्या मालकिचे ताज गादी भंडार दुकान आहे. शनिवारी दुपारी दीड वाजता ते जेवणासाठी दुकान बंद गेल्यानंतर दुकानात अचानक शॉर्ट सर्किट होवून धूर बाहेर येत असल्याचे पाहून नागरीकांनी आरडा-ओरड केल्याने मोठा जमाव जमला तर तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दुकानात असलेल्या कापसामुळे आग मोठ्या प्रमाणावर दुकानात पसरली. अग्निशमन दलाने तातडीने पाण्याचा मारा केल्याने आग विझली तर सुदैवाने तातडीने आग विझली अन्यथा आगीची झळ लगतच्या घरांना बसण्याची भीती होती. आगीमुळे पिंजारी यांच्या तयार गाद्या व गादी तयार करण्यास लागणारी रुई आणि मशीन असे सुमारे एक लाखांचे नुकसान झाल्याचे समजते. महसूल विभागाने पंचनामा केला.