यावल : शहरात सर्रासपणे पान-मसाला व गुटख्याची विक्री करणार्या तीन दुकानदारांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. असे असलेतरी बड्या विक्रेत्यांवर कारवाई न करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
बड्या विक्रेत्यांवरही व्हावी कारवाई
यावल शहरात, बुरुज चौक तथा पोलीस स्टेशन जवळील भागात, सुदर्शन चित्र मंदिर परीसरात, यावल बसस्थानक परीसरात, बोरावल गेट भागात गुटका सुगंधी सुपारी व पान मसाल्याचा माल पुरवठा करणारे ठरावीक व्यापारी असताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही मात्र तीन टपरी चालकांवर कारवाई करण्यात आल्याने तर्क-वितर्क लढवले जात आहे. सोमवार 8 रोजी तीन टपरी चालकांवर कारवाई करताना अन्न सुरक्षा अधिकारी आर.एन.भरकळ, किशोर साळुंके, सुवर्णा महाजन, सहाय्यक समाधान बारी, चंद्रकांत सोनवणे आदींच्या पथकाने कारवाई केली.