यावल- यावल शहरातील भुसावळ रस्त्यावरील जय गॅस एजन्सीचे कार्यालय अज्ञात चोरट्याने फोडल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आला असून त्यात चोरीस काहीचं गेले नाही व चोरटा सीसीटीव्ही कॅमेर्यात टिपला गेला. रहदारीच्या रस्त्यावरील असलेल्या हे दुकान फोडल्याने शहरात भीतीचेे वातावरण पसरले आहे. भुसावळ रस्त्याला लागुनचं स्नेहा विकास कुळकर्णी यांची एचपी गॅसची जय गॅस एजन्सी आहे. या एजन्सीच्या कार्यालयात मध्यरात्रीनंतर 3 वाजून 40 मिनिटाला एका अज्ञात चोेरट्याने शटर तोडून आत प्रवेश केला व थेट कॅश असलेले ड्रावर उघडले त्यात दिड हजार रूपयांची रोकड होती तेव्हा चोरट्याने त्या रोख रकमेला हात लावला नाही व उज्वला गॅसचे कामकाज चालणार्या विभागाकडे गेला आणी अवघ्या दोन ते तीन मिनिटात तो काही एक वस्तु न नेता बाहेर निघुन गेला. अज्ञात चोरट्याचे हे सर्व कृत्य सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहे. सकाळी पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, हवालदार गोरख पाटील यांनी घटनास्थळी जावुन पाहणी केली तर या दुकानातुन कुठलेही साहित्य चोरीस गेले नसल्याचे समोर आले. शहरात वाढत्या चोर्यांनी मात्र घबराट पसरली आहे.