आदिवासी तडवी भिल युवा कृती समिती व यावलकर तडवी बॉईज टिम तर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
यावल : आदिवासी तडवी भिल युवा कृती समिती व यावलकर तडवी बॉईज टिम तर्फे यावल शहरातील तडवी कॉलनी भागात कोरोना विषाणुच्या आजाराने उद्भवलेल्या आणीबाणीच्या परीस्थितीत हातमजुर, गरीब तसेच विधवा महिलांना असे 25 कुटुंबांचे रोजगार बंद पडल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना फुल नाही पण फुलाची पाकळीची मदत म्हणुन किराणा किट वाटण्यात आले. एका कुटुंबाला चार किलो तांदुळ, चार किलो गहू, दोन किलो साखर, एक किलो तूरदाळ, एक किलो तेल, एक किलो मीठ, शंभर ग्रॅम चहा पावडर, 50 ग्रॅम मिरची पावडर देण्यात आली. एकूण 25 कुटुंबांना ही मदत देण्यात आली.