यावलमध्ये तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

0
यावल- शहरातील भुसावळ रस्त्यालगत असलेल्या दूरसंचार विभागाच्या कार्यालयाजवळील रहिवासी प्रशांत रमाकांत सरोदे (30) याने शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र गळफास अधिक घट्ट होण्यापूर्वीच हा प्रकार कुटुंबीयांच्या निर्दशनास आल्याने तत्काळ दोर कापून त्यास येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. डॉ.नन्नवरे, डॉ.उमेश कवडीवाले, अधिपरिचारीका शीतल ठोंबरे, अरुण कोळंबे यांनी प्रथमोपचार केले व त्याची प्रकृती अधिक खालावल्याने त्यास रात्री जिल्हा रूग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजणक असल्याचे सूत्रांनी सांगितले.