यावल : शहरातील श्रीराम नगरातील तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. बुधवारी सकाळी 10 वाजता ही घटना घडली. कन्हैय्या रामचंद्र मेढे (26) असे मयत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. यावल शहरातील श्रीराम नगर परीसरात कन्हैय्या मेढे या तरुणाने बुधवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील छताच्या अँगलला ओढणीने गळफास घेतला. याबाबत यावल पोलिसात गोकुळ पंडीत मेढे यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण हे करीत आहे. दरम्यान मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला करीत आहेत.