यावलमध्ये तारांच्या घर्षणाने मोकळ्या जागेला आग

0

यावल- शहरातील बसस्थानकासमोरील विश्वास ट्रेडर्समागील पडीत जागेत सुकलेल्या कोरड्या गवताला गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग या परीरसरातून गेलेल्या विद्युत तारांच्या घर्षणामुळे झाल्याची चर्चा घटनास्थळी होती. शहराचे प्रख्यात सिमेंट आसारीचे व्यापारी जंगले यांच्या विश्वास ट्रेडर्समागे गुरूवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कामगार पी.व्ही.सी.पाईप मालाची गाडी खाली करत असताना अचानक त्यांना मागील मोकळ्या जागेत आग लागल्याचे निदर्शनास आले. कर्मचार्‍यांनी तत्काळ येथील विहिरीचा पाणीपुरवठा चालू करून आग विझवण्याचा प्रयत्न केला तसेच याबाबत यावल पालिकेलाही कळवण्यात आले. पालिकेच्या अग्निशमन दलाने धाव घेत पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. विद्युत तारा अवघ्या जमिनीपासून अवघ्या पाच ते दहा फुटावरच असल्याने वीज कंपनीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.