यावल– दुचाकी घसरल्याने चार जण जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या अपघातात दोन वर्षीय बालक गंभीर असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्यप्रदेशातील मुळ रहिवासी सुनिल लकड्या बारेला हा कुटुंबियासह यावल शहरातील एका शेतकर्याकडे सहकुटुंब कामास असून दुचाकी (क्रमांक एम.पी. 68 एम. डी.0579 )वर पत्नी बिना सुनील बारेला (28) व मुलगा राहुल बारेला (2) यांना घेेवून मध्यप्रदेशात लग्नाकरीता जात होता. भुसावळ रस्त्यावरील शेतातुन कुटुंबासह यावल शहरात येत असतांना रस्त्यावर त्याची दुचाकी घसरली. त्यात तिघे जखमी झाले. त्यात त्यांच्या दोन वर्ष वयाच्या राहुल याचा उजवा हात मोडला गेला व डोक्यास गंभीर दुखापत झाली. तिघांना ग्रामीण रुग्णालयात डॉ. रश्मी पाटील, जयश्री गडकरी, पल्लवी सुरवाडे यांनी प्राथमिक उपचार केले व तीघांना जिल्हा सामान्या रूग्णालयात दाखल करण्यात आहे आहे.