यावलमध्ये नगरसेवकाच्या भावावर प्राणघातक हल्ला

0

यावल- शहरातील मिलिंद रेस्टॉरंटसमोर शनिवारी सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी नितीन विश्वनाथ चौधरी व अंकुश गोविंदा कोळी यांच्यातील जुन्या भानगडीच्या वादातून झालेल्या भांडणात अंकुश कोळीने नितीन विश्वनाथ चौधरी यांच्या डोक्यात फावड्याचा लाकडी दांडा मारून जखमी केले. नितीन यास तत्काळ जळगाव येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आरोपी अंकुश कोळी यास यावल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावल येथील अंकुश गोविंदा कोळी (विठ्ठल वाडी, यावल) याची व येथील नगरसेवक अभिमन्यू विश्वनाथ चौधरी यांचे बंधू नितीन विश्वनाथ चौधरी यांची मिलिंद रेस्टॉरंटसमोर सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर अंकुश कोळी यांनी नितीनच्या डोक्यात फावड्याचा लाकडी दांडा टाकून त्याला रक्तबंबाळ केले. पोलिसांनी आरोपी अंकुश गोविंदा कोळी यास ताब्यात घेतले आहे.