यावलमध्ये पूरग्रस्तांसाठी मदत फेरी

0

यावल प्रतिनिधी । यावल शहरातून पीस एज्युकेशनल अ‍ॅँड वेल्फेअर सोसायटीने केरळमधील पुरग्रस्तांसाठी मदत निधी संकलन केले.

शहरातील चोपडा रस्त्यावरील इदगाह मैदानावर या उपक्रमाची सुरुवात हाजी शब्बीर खान मोहंमद खान यांच्या हस्ते झाली आणि माजी आमदार रमेश चौधरी, काँग्रेसचे जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर सोनवणे, नगरसेवक शेख असलम शेख नबी, बशीर मोमीन, अयाज खान, पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी यांच्या उपस्थितीत या उपक्रमाला सुरवात करण्यात आली. यानंतर ईदगाह मैदानापासून संपूर्ण शहरात मदतीसाठी रॅली काढण्यात आली. शेख अजहर शेख शमशोद्दीन, आकाश कोळी, पप्पू बिल्डर, शेख कलीम शेख रफीक, एजाज पटेल आदींचा त्यात सहभाग होता. हा सर्व मदतनिधी केरळमधील पुरग्रस्तांना देण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री निधीत रवाना करण्यात येईल, अशी माहिती संस्थेने दिली.