यावल : का रे दादू तू येथे काय करतो? तुझे येथे काही काम नाही तू घरी जा असे बोलण्याचा राग आल्याच्या कारणावरून तिघांनी एका महिलेसह दोघांनी मारहाण करीत पाहून घेईल अशी धमकी दिल्याने यावल पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास किनगांव बु.॥ येथे घडली. किनगाव बु.॥ येथील पुरुषोत्तम राजेंद्र पाटील (25) यांनी यावल पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मुरली मोहन कोळी यांच्या घरासमोर दादू कैलास कोळी (किनगांव बु.) यास मी बोलला की, कारे दादू तू येथे काय करतो तुझे येथे काही काम नाही, तू घरी जा असे बोलण्याचा राग आल्याच्या कारणावरून कैलास नामदेव कोळी याने आपल्या उजव्या खांद्यावर काठीने मारहाण केली तसेच आकाश कोळी याने साक्षीदार राजेंद्र निंबा पाटील (55) यांना डोक्यावर लोखंडी पाईप मारून दुखापत केली तर दादू कैलास कोळी याने स्वतःला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच आई आशाबाईला लोटून देऊन तिन्ही आरोपीनी माझ्या आईला शिवीगाळ करून पाहून घेण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कैलास कोळी, आकाश कोळी, दादू कोळी या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक विकास सोनवणे करीत आहे.