यावलमध्ये माथेफिरूंनी पेटवल्या दुचाकी

0

यावल : शहरातील धनगर वाड्यामध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात माथेफिरूने दोन दुचाकीला आग लावून दिल्याने खळबळ उडाली आहे. या आगीत सुमारे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले असून यावल पोलिसात आग लागल्याची खबर देण्यात आली. शहरातील मेनरोड धनगर वाड्यातील रहिवासी मनोहर दगडू चौधरी यांच्या मालकीच्या एक स्कुटी (क्रमांक एम.एच. 19 डी.जी. 6756) व एक दुचाकी (क्रमांक एम.एच.19 सी.ए.3370) या दोन्ही दुचाकी त्यांच्या राहत्या घराबाहेर लावल्या असताना रविवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात व्यक्तीने या दोन्ही दुचाकींना आग लावली. अचानक ही आग वाढल्याने शेजारील नागरीकांनी मध्यरात्रीच चौधरी कुटुंबीयांना माहिती देत आग विझवली मात्र तत्पुर्वी दोन्ही दुचाकी जळुन सुमारे 70 हजारांचे नुकसान झाले. तपास सहायक फौजदार नेताजी वंजारी करीत आहे.