यावल- पेहरन-ए-शरीफ उत्सवानिमित्ताने येथील हडकाई नदीपात्रात बुधवारी सायंकाळी कुस्तीच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले. फडासाठी बर्हाणपूर, मालेगाव, चाळीसगाव, हरीयाणा, भुसावळ, रावेर यासह दुरवरून मल्ल आले होते. भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांचे हस्ते कन्नडचे शकील पहेलवान व मालेगावचे विजय पहेलवान यांच्यात हस्तांदोलन करून कुस्तीची जोड लावण्यात आली. कन्नडच्या शकील पहेलवानाने बाजी मारली. दरवर्षीप्रमाणे पेहरन ए शरीफ उत्सवाच्या दुसरे दिवशी बुधवारी कुस्तीचा फडाची परंपरा आहे. त्यानुसार बुधवारी येथील हडकाई नदीपात्रात सायंकाळी उत्सव समीतीच्या वतीने आयोजन करण्यात आले.
लहान-मोठ्या 80 कुस्त्यांच्या लढती
कुस्तीच्या फडात लहान-मोठया सुमारे 80 कुस्त्या लढल्या गेल्यात. त्यात लक्षणीय ठरलेल्या कुस्त्यांमध्ये यावलचे जुबेर पहेलवान तर रावेरचे कालु पहेलवान यांची कुस्ती ठरली. त्यात जुबेर पहेलवानाने बाजी मारली. बर्हाणपूरचा सलमान पहेलवान तर हरीयाणाचे जुबेर पहेलवान यांच्यात झालेल्या सुमारे अर्ध्या तासाच्या लढतीनंतर कुस्ती बरोबरीने सोडण्यात आली. दोन्ही हरीयानाचे जुबेर पहेलवान व अज्जु पहेलवान यांच्यात झालेल्या लढतीत जुबेर पहेलवान यांनी बाजी मारली. यावलचे राहुल (मुका) पहेलवान यांनी खिर्डी, ता.चाळीसगाव संदीप पहेलवान यांना आसमान दाखवले. यासह विजय गवळी मालेगाव, सुनल पहेलवान, कोल्हापुर, यावलचे बाबा पहेलवान, खिर्डीचे किरण पहेलवान यांच्यातील लढती लक्षणीय ठरल्या. यावलचे उपनगराध्यक्ष मुकेश येवले, नगरसेवक शे.असलम शे.नबी, अभिमन्यु चौधरी, भुसावळचे सचिन संतोष चौधरी यांच्यासह हरातील कुस्तीशौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंच म्हणून रशीद पहेलवान, मुक्तार पहेलवान होते. पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी व सहकार्यांनी बंदोबस्त राखला.