यावलमध्ये रीलायन्ससह टाटा इंडीकॉमचे टॉवर अखेर सील

0

महसुलचा कर न भरल्याचा फटका ; ग्राहकांचे हाल

यावल- महसूल विभागाच्या कर नोटीसा बजावुनदेखील कर अदा न केल्यामुळे यावल शहरातील रीलायन्स व टाटा इंडीकॉम या कंम्पनीचे दोन टॉवर तहसीलदार कुंदन हिरे यांच्या आदेशान्वये गुरूवारी सील करण्यात आले. शहरातील बोरोले नगरात व आसाराम नगरात असलेल्या मोबाईल टॉवरकडे मोठ्या प्रमाणावर महसुली कर थकला होता. रीलायन्स व टाटा इंडीकॉम कंम्पनीचे हे टॉवर असून त्यांच्याकडे प्रत्येकी 74 हजार 154 असे एकूण एक लाख 48 हजार 308 रूपये महसुली कर घेणे होते तेव्हा तहसिलदार कुंदन हिरे यांच्या कडून त्यांना वसुल संर्दभात नोटीस बजावण्यात आली मात्र, त्यांनी कर अदा न केल्याने गुरूवारी मंडळाधिकारी ई. व्ही.महाडीक व तलाठी एस.व्ही.सुर्यवंशी यांनी दोन्ही टॉवर सील केले.