यावलमध्ये लाभार्थींना मोफत तांदुळाचे वाटप

0

यावल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत यावल येथील दुकान क्रमांक 104 मधून लाभार्थींना मोफत तांदूळ वाटप करण्यास सुरुवात आली. प्रति लाभार्थी पाच किलोप्रमाणे तांदूळ वाटप करण्यात आला. यावेळी नगरसेवक अभिमन्यु चौधरी यांच्या प्रमुख उपस्थिती होती तर सामाजिक कार्यकर्तेशेर खान, अलताफ अहमद शेख असलम उपस्थित होते. दरम्यान, तांदूळ वाटप दरम्यान सोशल डिस्टनचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. मोफत तांदूळ वाटप झाल्याने लाभार्थींनी समाधान व्यक्त केले.