यावल : शहरातील एका 32 वर्षीय महिलेने विषारी द्रव्य प्राषण करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दुुर्गा राजेंद्र पारधे असे या महिलेचे नाव असून ही घटना गुरूवारी साकळी नऊ वाजता उघडकीस आली. तिच्या कुटुंबीयांनी या महिलेला तत्काळ ग्रामीण रूग्णालयात उपचार्थ दाखल केले. तेथे डॉ. रश्मी पाटील , आरती कोल्हे यांनी प्रथमोपचार केल्यानंतर प्रकृती खालावल्याने अधिक उपचारार्थ जिल्हा सामान्य रूग्णालयात हलवले.