यावलमध्ये सराफा व्यावसायीकाला बंदुक दाखवत लाखोंचे सोने लुटले

यावल : शहरातील सराफा बाजारातील जगदीश कवडीवाले यांच्या मुख्य बाजारपेठेतील बाजीराव काशिनाथ कवडीवाले नामक सराफा दुकानात पिस्टलधारी चौघा दरोडेखोरांनी सराफाच्या कानशीलावर बंदुक ठेवत लाखो रुपये किंमतीचे सोनू लुटले. बुधवार, 7 रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली. सोने लुटीनंतर दरोडेखोर पळत असताना एकाने त्यास अटकाव केला असता दरोडेखोरांनी पिस्टलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला मात्र पिस्टल लॉक झाल्याने संशयीतांनी दोघे पिस्टल फेकत पल्सर गाडीवरून पळ काढला. अवघ्या पाच ते दहा मिनिटात लूट करून चोरटे पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चौकशीचे काम सुरू आहेत. नेमका किती माल आणि रोकड दरोडेखोरांनी लुटून नेली ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.